भंगार व्यावसायिकाची केली रिक्षा चालकाने हत्या



पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील वावंजे गावात राहणार्‍या यावुब युनुस खान (60) या भंगार व्यावसायिकाची त्याच भागात राहणार्‍या श्रीकांत राम अकबल तिवारी या रिक्षा चालकाने धारदार हत्याराने भोसकून तसेच गळा आवळत हत्या करुन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. 
2 नोव्हेंबर रोजी याकुब खान यांचा मृतदेह मोरबे गावालगच्या झुडपांमध्ये आढळून आल्यानंतर हत्येचा सदर प्रकार उघडकीस आला. त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांनी आरोपी श्रीकांत तिवारी याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. दरम्यान, आरोपीच्या अटकेनंतर या हत्येमागील कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत याकुब युनुस खान पनवेल तालुक्यातील वावंजे गावात राहण्यास असून त्यांचा भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. 26 ऑक्टोर रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या घरातून टिव्हीएस ज्युपिटर स्कुटीवरुन बाहेर पडले होते. मात्र, ते त्यादिवशी उशीरापर्यंत घरी न परतल्याने त्यांचा मुलगा इम्रान यावुब खान याने त्यांचा सर्वत्र शोध घेऊन 27 ऑक्टोबर रोजी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात वडील याकुब खान बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पनवेल तालुका पोलिसांनी बेपत्ता याकुब खान यांचा शोध घेण्यासाठी 29 ऑक्टोबर रोजी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मृत याकुब खान 26 ऑक्टोबर रोजी आपल्या स्कुटीवरुन वावंजे गावातील संशयित आरोपी श्रीकांत तिवारी याच्यासोबत मोरबे गावाच्या दिशेने जाताना निदर्शनास आले. 
त्यानंतर सुमारे एक तासाने श्रीकांत तिवारी त्याच स्वुटीवरुन फक्त एकटाच परत आल्याचे आढळून आले. त्यानंतर श्रीकांत तिवारी याने याकुब खान यांची स्वुटी महोदर येथील तळ्यामध्ये टाकून पलायन केले. पोलिसांनी मृत याकुब खान यांच्या स्वुटीचा शोध घेतला असता, ती महोदर येथील तळ्यात आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी श्रीकांत तिवारी याचा शोध घेतला असता, तो आपल्या घरातून पळून गेल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांकडून फरार श्रीकांत तिवारी याचा शोध सुरु असताना, 2 नोव्हेंबर रोजी मोरबे गावच्या हद्दीत अग्रवाल फार्म, कुंभारखोती येथील पायवाटे जवळ गवतामध्ये यावुब खान यांचा वुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. पनवेल तालुका पोलिसांनी सदरचा मृतदेह ताब्यात घेऊन पनवेल उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले. शवविच्छेदनात याकुब खान यांच्या पाठीत धारदार हत्याराने भोसकून तसेच त्यांचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा अहवाल वैद्यकिय अधिकार्‍यांनी दिला. यावरुन आरोपी श्रीकांत तिवारी यानेच याकुब खान यांची हत्या करुन पलायन केल्याचे आढळून आल्यानंतर पनवेल तालुका पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
थोडे नवीन जरा जुने