महायुतीचे उमेदवार लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर सेंट्रल पार्क तसेच खांदा कॉलनी येथे मॉर्निंग वॉकच्या अनुषंगाने नागरिकांशी संवाद साधला.

पनवेल विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर  सेंट्रल पार्क तसेच खांदा कॉलनी येथे मॉर्निंग वॉकच्या अनुषंगाने नागरिकांशी संवाद साधला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे.

 सर्व समाजातील व्यक्तींचा आणि त्यांचा अतूट नाते आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होऊन समर्थन मिळत आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, साजिद पटेल, संतोष शर्मा, विनोद घरत, गीता चौधरी, अभिषेक भोपी, मोतीलाल कोळी आदी उपस्थित होते. 

थोडे नवीन जरा जुने