राष्ट्र्रवादी काँग्रेस उलवे शहरप्रमुखपदी बाळू म्हात्रे यांची नियुक्ती




पनवेल, दि.6 (संजय कदम) ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  (शरदचंद्र पवार) गटाच्या उलवे शहरप्रमुखपदी तरुण तडफदार व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे बाळू म्हात्रे यांची आज नियुक्ती पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
आज महाविकास आघाडीचे उरण मतदार संघाचे उमेदवार मनोहर भोईर यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीमध्ये पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, दिपीका भंडारकर यांच्यासह इतर पदाधिकार्‍यांच्या
 उपस्थितीत उलवे शहरप्रमुखपदी तरुण तडफदार व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे बाळू म्हात्रे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. तसेच नियुक्तीपत्र त्यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या मिळालेल्या जबाबदारीचे पालन करीन तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांना जास्तीत जास्त मतदान उलवे परिसरातून होण्यासाठी अथक परिश्रम करीन असे मत नवनिर्वाचित शहरप्रमुख बाळू म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
थोडे नवीन जरा जुने