राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधण्यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप रंगला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना मुंख्यात शिवरायांचे मंदिर बांधण्याचे आव्हान दिले,
ज्याला राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्वीकारले. आव्हाड यांनी म्हटले की, सरकारने जागा व परवानग्या दिल्यास मंदिर बांधू आणि उद्घाटनाला ठाकरे यांना बोलावू, फडणवीसांनी ठाकरेंना शिवरायांचे मंदिर बांधण्याचे आव्हान कोल्हापूरमध्ये केले, तर आव्हाड यांनी मुंब्याला बदनाम न करण्याची मागणी केली.
Tags
मुबंई