विधानसभा निवडणुकीतील राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार असलेल्या भाजप नेते पराग शाह यांच्यासोबत दुर्दैवी घटना घडली आहे. घाटकोपर पूर्व विधानसभा मत्तदारसंघातून निवडणूक लढवणारे पराग शाह मंगळवारी त्यांच्या घरी पाय घसरून पडले आणि त्यांना तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले.
त्यांच्या डाव्या पायाच्या हाडाला दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले, परिणामी, डॉक्टरांनी त्यांना घरी राहून आराम करण्याचा सल्ला दिला आहे. या घटनेमुळे घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या प्रचारात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
Tags
मुंबई